Breaking News

रस्त्यावर संदेश लिहून जनजागृती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेण पालिकेचा उपक्रम

पेण : प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेण शहरात नगर परिषदेमार्फत स्वच्छता व जनजागृती मोहीम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील रस्त्यांवर प्रबोधनात्मक संदेश लिहून जनजागृती करण्यात येत आहे.

पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, फवारणी, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सर्व कर्मचार्‍यांना आरोग्यविषयक साहित्य देण्यात आलेले आहे. कोरोना प्रादुर्भावाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर, पोस्टर लावण्यात आले आहेत तसेच दवंडीद्वारे जनजागृती करण्यात येते. खासकरून शहरातील रस्त्यांवर  जनजागृतीपर बोधवाक्य लिहिण्यात आली आहेत, असे मुख्याधिकारी अर्चना

दिवे यांनी सांगितले.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply