Breaking News

नागोठणेत जोगेश्वरी मर्चंट पतसंस्थेकडून आर्थिक मदत

नागोठणे ः प्रतिनिधी

कोरोनाची शहरातील नागरिकांना लागण होऊ नये यासाठी दिवसरात्र काम करणार्‍या येथील ग्रामपंचायतीच्या स्वच्छता विभागासह इतर कर्मचार्‍यांना शाबासकीची थाप म्हणून सहकार्याच्या भावनेतून जोगेश्वरी मर्चंट पतसंस्थेकडून आर्थिक मदत देण्यात आली. या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा रा. जि. प. सदस्य किशोर जैन, सरपंच तथा संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद धात्रक, सचिव संजय काकडे, उपसरपंच सुरेश जैन, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, सदस्या राजश्री टेमकर, दिनेश जैन, शैलेश रावकर, राजू टेमकर, दीपिका गायकवाड आदी उपस्थित होते.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply