Breaking News

कोरोना : प्राण्यांची कार्यशाळा

प्राण्यांचा राजा सिंह बरेच दिवस जंगलामध्ये नेहमी प्रमाणे फेरफटका मारत होता. तो खूप चिंतेत होता. एक दिवस त्याने सर्व प्राण्यांची बैठक बोलाविली. सिंहाने बैठक बोलविल्यामुळे सर्व प्राणी बैठकीला हजर राहिले. सिंहाने बैठकीला सुरुवात केली व सुरुवातीलाच सांगितले की, आज आपण एका अति गंभीर विषयावर बैठक बोलाविली आहे. सिंह म्हणाला की मित्रानो तुम्हाला माहित आहे का आपला मित्र मनुष्य प्राणी सध्या आपल्या जंगलामध्ये भेट देत नाही. मला ह्या आपल्या मनुष्य प्राण्याची खूप काळजी वाटत होती म्हणून मी मनुष्य प्राण्याच्या वस्तीत गेलो होतो. तिथे पण खूप शुकशुकाट होता. तिथे मला आपल्या सर्कसचा रिंग मास्टर भेटला. त्याला मी विचारपूस केली. त्याने सांगितले की, कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे माणसांना बाहेर पडणे शक्य होत नाही आहे. म्हणून आम्ही भौतिक अंतर ठेऊन कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयन्त करीत आहोत. सिंह म्हणाला आपला मनुष्य प्राणी मित्र खूप घाबरलेला व चिंतेत होता. सिंह म्हणाला आपल्या मनुष्य प्राणी मित्राला आपण संकट समयी मदत करायला हवी ह्यासाठी ही तातडीची बैठक बोलाविली आहे. काही उपस्थित प्राण्यांनी मनुष्य प्राण्याला का मदत करायची असे विचारले ? मनुष्य प्राणी सुद्धा आपल्या मित्रांना त्रास देत असतो. कधी कधी तर जीवे सुद्धा मारतो. पोपट म्हटला की, मला तर पिंजर्‍यात कैद केले जाते. साप म्हणला मला ठार मारले जाते. ससा व कोंबडी म्हणाले की माझे मांस माणसाला खूपच आवडते. यावर सिंह म्हटला की, आपण सुद्धा प्राणी आपसात शिकारीसाठी भांडत असतो. एकमेकाला जीवे मारतो. तो तर मनुष्य प्राणी आहे. काही आपल्या बद्दलच्या गैरसमजुतीमुळे मनुष्य प्राणी आपल्याला वाईट वागणूक देतो. पोपटाला कैद करतो मात्र पिंजर्‍यात त्याची जेवणाची खूप काळजी घेतो. व तुझ्या सोबत गोड गोड बोलतो. साप तू डंख मारतो म्हणून तुला मनुष्य प्राणी मारतो. तू जर शंकराच्या पिंडीवर दिसला तर तुझी नागपंचीमीला पूजा सुद्धा करतो. ससा व कोंबड्यांचे तर मनुष्यप्राणी कुकुटपालन व फार्मिंग करून आपली जमात वाढवितो. आपला मित्र कुत्रा याच्या वर तर त्याचे खास प्रेम आहे. तो तर त्याला त्याच्या घरात ठेवतो त्याची खाण्यापिण्याची एवढेच नाही तर वैद्यकीय सुविधा सुद्धा त्याला पुरवितो. सिंह असेही म्हणाला की, आपला मित्र मनुष्य प्राण्याने आपली बरीच काळजी व मदत केली आहे.

जुन्या काळी पाण्याचा साठा नसायचा. वर्षभर पाणी आपल्याला मिळायचे नाही. उन्हाळ्यात तर आपली खूप भटकंती पाण्यासाठी व्हायची. मनुष्य प्राण्याने बरीच तलाव व धरणे बांधून ठेवलेली आहेत. त्यामुळे आपल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.आपण जर त्यांच्यावर प्रेम केले तर तो सुद्धा आपल्यावर प्रेम करेल असे सिंह सर्व प्राण्याला म्हणाला.सिंहाचे ऐकल्यानंतर उपस्थित सर्व प्राण्यांनी मदत करण्यासाठी सहमती दर्शवली. हरीण, सांबर, ससा, उंट, माकड म्हणाले की ते जंगलातील औषधी वनस्पती शोधून आणतो. तर कासव, मगर व साप यांनी सुद्धा मनुष्य प्राण्यासाठी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लस औषधी लगेच शोधून आणतो असे सांगितले. सिंह म्हणाला की, पृथ्वी व निसर्गाचा जसा आपण एक भाग आहोत तसा मनुष्य सुद्धा एक निसर्गाचा व पर्यावरणाचा भाग आहे. आपण ह्या समयी मनुष्य प्राण्याला कोरोनामुक्त करून ह्या पृथ्वीवर परत नंदनवन घडवूया! सर्व प्राणी मनुष्य प्राण्याला संकटकाळी मदत करण्याचा निश्चय करून कोरोनावर औषध शोधण्यासाठी दूर जंगलात निघून गेले.अशाप्रकारे प्राण्यांची कार्यशाळा यश्वीपणे संपन्न झाली.

-अरविंद मोरे, 1101, साई सितारा, सेक्टर 6, नवीन पनवेल पूर्व

Check Also

सीकेटी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर …

Leave a Reply