Breaking News

खान्देश रहिवासी सेवा संघातर्फे रिक्षाचालक-मालकांना मदत

खोपोली : प्रतिनिधी – खोपोली खान्देश रहिवासी सेवा संघाकडून येथील रिक्षाचालक-मालक संघटनेच्या 35 गरजू सभासदांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. यासाठी सेवा संघाच्या सदस्यांकडून विशेष निधी जमा करण्यात आला होता.

लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. परिणामी अनेक रिक्षाचालक व मालकांना आर्थिक व दैनंदिन गरजू साहित्य खरेदीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांना खान्देश रहिवासी सेवा संघाकडून मदतीचा हात देण्यात आला. संघाचे अध्यक्ष ईश्वर कासार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी पी. वाय. पाटील, गोकुळ बडगुजर, उल्हास कराड, विकास निकम आदींनी यासाठी पुढाकार घेतला. यात अनेक सदस्यांनी आर्थिक मदत केली.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply