खालापूर : प्रतिनिधी
खोपोली ढेकू औद्योगिक वसाहतीतील कमानी आईल कंपनीमधून खाद्यतेल घेऊन जाणार्या टँकरने झोराबियन कंपनीच्या चिकनवाहक टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. 29) सायंकाळी 5च्या सुमारास खोपोली-पेण मार्गावरील साजगाव फाटा येथे झाला.
या अपघातात टेम्पोचालक सागर कांबळे, अनसर पठाण आणि जांबरुंग ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सीताराम कातवार (वय 55) यांचा मृत्यू झाला आहे. एका जखमीला खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Check Also
अमृत महोत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन
पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मल्हार नेटवर्क प्रा. …
RamPrahar – The Panvel Daily Paper