Breaking News

सावळे येथे दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

कडाव : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील सावळे येथील दोन गटातील जमावाने वैयक्तिक कारणातून एकत्र जमून शाब्दिक भांडणाचे रुपांतर हाणामारीत होऊन एका परिवाराला दांडक्याच्या साह्याने बेदम मारहाण करीत रायगडचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. या जमावाने रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचाही भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा नोंद करण्यात आला असून कर्जत पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आरुण भोर यांच्या नेतृत्वाखाली बीट अंमलदार लोखंडे हे या गुन्ह्यासंदर्भात पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या मारहाणप्रकरणी कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत या गुन्ह्यासंदर्भात कर्जत पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply