ग्राम प्रशासन सतर्क

रोहे ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्यात आल्यापासून रोहा तालुक्यात बाहेर ठिकाणाहून 12,070 नागरिक आले आहेत. यामध्ये परदेशातून 30, परराज्यातून 182, तर राज्यभरातून 11,858 नागरिक आले आहेत. मागील दोन दिवसांत 155 नागरिक रोह्यात आले आहेत. या लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. यातील बहुतांश लोकांचे होम क्वारंटाइन संपले असून अद्याप रोहा तालुक्यात 1833 लोक होम क्वारंटाइन आहेत. गावी जाण्याची मुभा मिळाल्यानंतर नागरिक गावाकडे येत आहेत. मागील दोन दिवसांत शंभरहून अधिक लोक आल्याने आता हे प्रमाण वाढणार असल्याने याचा ताण ग्राम प्रशासनावर पडणार आहे. त्या अनुषंगाने ग्राम प्रशासनातील सरपंच, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, पोलीस पाटील सतर्क झाले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper