Breaking News

घोट संघ आमदार चषकाचा मानकरी

पनवेल : बातमीदार :

पनवेल तालुक्यातील विहिघर येथे सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने प्रकाशझोतातील पाचदिवसीय आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात घोट संघाला प्रथम क्रमांक पटकाविला; नेरेपाडा संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात घोट संघाने नेरेपाडा संघाला हरवत दीड लाख व भव्य चषकावर आपले नाव कोरले. विहिघर येथे प्रकाशझोतातील क्रिकेट सामन्यात अनेक संघांनी आपला सहभाग नोंदविला. या वेळी अनेक सामने चुरशीचे झाले. द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नेरेपाडा संघाला भव्य चषक व 75 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply