Breaking News

स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

गव्हाण : रामप्रहर वृत्त – गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये पनवेल-उरण पंचक्रोशीतील सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंता ठाकूर, विश्वनाथ कोळी, जयवंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत व विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे आदींनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत स्व. जनार्दन भगत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या वेळी काही निवडक सेवक उपस्थित होते.

Check Also

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे यासाठी आम्ही आग्रही -मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. …

Leave a Reply