मुरूड ः प्रतिनिधी – मुरूड पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचार्यांना अंजुमन डिग्री सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वडे, समोसे, खजूर, कलिंगड, केळी व शहाळी असे पदार्थ पोलिसांना देण्यात आले. मुरूड पोलीस ठाण्यात एकूण 42 पोलीस कार्यरत असून या सर्वांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.
Check Also
मराठी चित्रपटांसाठीचे पुरस्कारही वैशिष्ट्यपूर्ण
चित्रपट संस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, पुरस्कार. असे पुरस्कार म्हणजे आपण केलेल्या कामाची विशेष दखल आणि …
RamPrahar – The Panvel Daily Paper