Breaking News

अतिउत्साही पर्यटकांवर पोलिसांचा वॉच; रायगड जिल्ह्यात बंदोबस्तात मोठी वाढ

अलिबाग : प्रतिनिधी

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी  रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येनी पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वहातुक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. वाहतुक नियंत्रणासाठी 86 ठिकाणी 90 वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. अतिउत्साही पर्यटकांवर,  मद्यपान करून वाहन चालवणार्‍या चालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांच्या तीन स्पीड बोटी रात्र दिवस गस्ती ठेवण्यात येणार आहेत. नाताळाचा सण आणि लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभुमीवर 24 आणि 25 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात जवळपास 25 हजार पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढली होती. त्यामुळे कोंडी झाली होती. वडखळ बायपास ते पेझारी हे आठ ते दहा किलोमिटरचे अंतर पार पाडण्यासाठी दिड ते दोन तास लागत होते. त्यामुळे वाहनचालक आणि प्रावाश्यांचे हाल झाले होते. त्यामुळे वाहतुक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येनी पर्यटक येण्याची शक्याता आहे. शनिवारी आणि रविवारी दिवस झालेली वाहतुक कोंडी लक्षात घेऊन, वाहतुक नियमानासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. वाहतुक निंयत्रणासाठी 86 ठिकाणी 90 वाहतुक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. मद्यपी वाहनचालकांवर या सर्वांची नजर असणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील प्रमुख समुद्र किनार्‍यांवर तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. बीट मार्शल्स, दामिनी पथक, साध्या गणवेषातील कर्मचार्‍यांसह, सशस्त्र पोलीस बंदोबस्त किनार्‍यांवर ठेवला जाणार आहे. 76 अधिकारी 412 पोलीस अंमलदार तैनात केल्या जाणार आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ठिकठिकाणी न्यु ईअर सेलिब्रेशन पार्टीजचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल व्यवसायिकांनी ऑर्केस्ट्रा, डिजे नाईट्स, गाला डान्स, सेलिब्रिटी नाईट्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कपल एन्ट्रीसाठी निरनिराळ्या ऑफर्स पुरवल्या जात आहे. पार्टीनवर पोलिसांची नजर राहणार आहे. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याकडे विशेष पथके तयार करण्यात आलेली असुन हॉटेल, धाबे, कॉटेज, फार्म हाउस येथे गैरकृत्य होणार नाही याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. दारू पिवुन गोंधळ घालणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस पथके नेमण्यात आलेली आहेत. आमली पदार्थांचे सेवन आणि वितरण होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने साध्या वेशातील पोलीस व महिला अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.

हॉटेलमध्ये बुकिंग फूल्ल

जिल्ह्यातील हॉटेलमध्ये 90 टक्के बुकिंग झाले आहे. आयत्या वेळी बुकींग करण्यासाठी पर्यटकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. रविवारी (दि. 1) नवीन वर्षाची सुरुवात आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पसंती दिली असून, जिल्ह्यात विशेषतः किनारपट्टीवर पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. शुक्रवारी (दि. 30) पर्यटकांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे. प्रमुख पर्यटनस्थळांवरील राहण्याचे बुकींग याआधीच झाल्याने आयत्यावेळी नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात येण्याचे बेत केलेल्या पर्यटकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply