अलिबाग, पनवेल, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
अलिबाग तालुक्यातील बहिरोळे-मापगाव येथील 51 वर्षीय व्यक्तीची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी (दि. 19) मृत्यू झाला. अलिबागमधील कोरोना पॉझिटिव्हचा हा पहिलाच मृत्यू आहे. ही व्यक्ती कॅन्सरबाधित होती. याशिवाय जिल्ह्यात मंगळवारी 25 रुग्ण आढळले. त्यात पनवेल महापालिका हद्दीतील 18, पनवेल ग्रामीणमधील दोन, पेण तालुक्यातील तीन आणि उरण तालुक्यातील दोन अशा 25 जणांचा समावेश आहे.
नव्या रुग्णांमुळे पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या 289, ग्रामीण 116 आणि दोन्ही मिळून तालुक्यात 405 झाली, तर जिल्ह्याचा एकूण आकडा 571वर पोहचला आहे.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper