Breaking News

भाजप मुरूड तालुका, जिल्हा कार्यकारिणी नियुक्त्या जाहीर

मुरुड : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या आदेशानूसार पक्षाच्या ध्येयधोरणानूसार तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सन 2020 ते सन 2023 या तीन वर्षीय कालावधीकरीता तालुका व जिल्हा कार्यकारिणी नियुक्ती शिफारस करण्यात आली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचितांना नियुक्ती पत्र घरपोच देण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर यांनी दिली.

पक्षाच्या ध्येय धोरणानूसार होणार्‍या या नियुक्तीत तालुका सरचिटणीसपदी नरेश वारगे, जीवन सुतार, उपाध्यक्ष पदी समीर शिंदे, नरेंद्र म्हात्रे, राजेंद्र सुतार, कृष्णा किंजळे, तालुका चिटणीस पदी प्रशांत भोय, धनेश गोगर, कुमार उर्फ काशिनाथ आरकशी, अमित पुलेकर, चेतन काटकर, भरत जोशी, महिला तालुका अध्यक्ष सुचिता घाग, सरचिटणीस पदी निलम ठाकूर, श्रमिका खोत, अल्पसंख्याक तालुका अध्यक्षपदी वसिम नाडकर, महिला अध्यक्षपदी नसिम हनीफ उलडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी दिपक गिते, शहर अध्यक्षपदी उमेश माळी, प्रज्ञा सेल तालुका अध्यक्षपदी नयन कर्णिक, प्रज्ञा शहर अध्यक्षपदी जगदीश पाटील, सांस्कृतिक सेल अध्यक्ष पदी संजय भायदे, ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्षपदी संजय खोत, वाहतूक सेल तालुका अध्यक्ष पदी मंगेश पाटील यांची तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी जनार्दन उर्फ आण्णा कंधारे, सुरेश म्हात्रे, जयवंत अंबाजी, शैलेश काते यांची तर संदीप चिरायु यांची सोशल मिडिया जिल्हा सहसंयोजक पदी शिफारस करण्यात आली आहे.

सर्व नवनिर्वाचितांना घरपोच नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याचे तसेच काही रिक्त पदावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येणार असल्याचे महेंद्र चौलकर यांनी सांगितले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 अभंगांचे व्हिडीओ चित्रिकरण

नादब्रह्म साधना मंडळाचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्तथोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply