Breaking News

महाकाय ट्रेलरने रोखला मुंबई-पुणे महामार्ग

खालापूर : प्रतिनिधी – मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील अंबानी रुग्णालयासमोर मंगळवारी (दि. 26) सकाळी एक महाकाय ट्रेलर अडकला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

अवजड वस्तू वाहून नेणारा ट्रेलर मुंबई लेनवरून पुणे लेनवर येत होता. त्या वेळी महामार्गाच्या मधील उंचवट्यावर ट्रेलरचा खालील भाग लागला आणि हा ट्रेलर दोन्ही मार्गिकांच्या मधोमध अडकून पडला. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक खोळंबली. काही वेळाने हा ट्रेलर मार्गस्थ झाल्यावर वाहतूक पूर्ववत झाली.

Check Also

भाजपची गव्हाण विभाग नूतन कार्यकारिणी जाहीर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक …

Leave a Reply