देशभरातील आठशेहून अधिक प्राध्यापकांचा उर्त्स्फूत सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त
शिक्षणासह कला, क्रीडा, गुणवत्ता आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या नॅक पुनर्मूल्यांकनद्वारे ए प्लस दर्जा मानांकित, विद्यापीठ अनुदान आयोगाचे श्रेष्ठत्व सक्षम महाविद्यालय दर्जा आणि मुंबई विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट
महाविद्यालय पारितोषिक प्राप्त करणार्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ‘कोविड 19 काळातील बदलता दृष्टिकोन, परिवर्तन व्यवस्थापन व कार्यनीती’ या विषयांतर्गत गुणवत्ता हमी विभाग आणि व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन नुकतचे करण्यात आले होते. या चर्चासत्रात संपूर्ण देशभरातून आठशेहून अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रातून सध्याच्या काळातील कोरोनाच्या परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा आणि व्यवस्थापनात परिवर्तन करून कार्यनिती कशी असावी यावर ऊहापोह करण्यात आला. चर्चासत्रासाठी के. जे. सोमय्या कॉलेजच्या सहाय्यक प्रा. डॉ. शोभा मॅथ्यूज बेनेट यांना आमंत्रित करण्यात आले होते. चर्चासत्राच्या शिस्तबद्ध नियोजनासाठी संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन चर्चासत्राच्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य व सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. डी. बर्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एलिजाबेथ मॅथ्यूज, हैदराबादच्या पी. जी. आरोरा महाविद्यालय संचालक डॉ. एम. माधवी व पुणे येथील मॉडेल इन्स्टिट्यूट संचालक डॉ. विजयालक्ष्मी श्रीनिवास यांनी केले होते. त्यानुसार चर्चासत्रास उत्तम प्रतिसाद लाभला. उपक्रमाचे आयोजन व्यवस्थापक विभागाच्या प्रमुख व चर्चासत्राच्या समन्वयक तृप्ती जोशी आणि इतर प्राध्यापकांनी केले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper