दोन महिन्यांनतर ‘त्या’ मायलेकरांची भेट

पनवेल : प्रतिनिधी – पालघर येथील महेश जोशी यांचा 10 वर्षाचा मुलगा त्यांच्या नातेवाइकांकडे सिल्व्हासाला गेला आणि लॉकडाऊन जाहीर झाले. अखेर दोन महिन्यांनी तो आपल्या वडीलांबरोबर सिल्व्हासाहून परत आला. आपल्या मुलाला परत आलेले पहाताच त्याच्या आईला अश्रु आवरता आले नाहीत. आपल्या मुलाची भेट घडवून आणणार्‍या पनवेलच्या संदीप रोडे यांचे त्यांनी फोन करून आभार मानले

संदीप रोडे यांना काही दिवसापूर्वी पालघरहून महेश जोशी यांचा फोन आला. साहेब माझा 10 वर्षाचा मुलगा सिल्व्हासाला नातेवाईकांकडे गेला आणि लॉकडाऊन झाल्यामुळे अडकला आहे. त्याला आणण्यासाठी टोकन नंबर मिळतो पण दोन वेळा प्रयत्न केले पास देतो म्हणतात पण पास मिळत नाही मला मदत करा. तुमचा नंबर मला माझे पोलीसमध्ये राठोड म्हणून मित्र आहेत त्यांनी दिला आहे. जव्हार येथील नायब तहसिलदार वसंत सांगले यांना संदीप रोडे यांनी विनंती केली आणि महेश जोशी यांना फासा मिळाला त्यांनी फोन करून आभार मानले.

नैसर्गिक आपत्ती आली की, महसूल कर्मचारी नुकसानीचे पंचनाम्यापासून मदत वाटण्यापर्यंतची काम करीत असतात. या वाटपात झालेल्या गोंधळाच्या कहाण्या आपणनंतर अनेक दिवस ऐकत असतो पण याला काही अपवाद ही असतात. पनवेलचे मंडळ अधिकारी संदीप रोडे, करंजाडेचे तेलंगे अण्णा, तलाठी राठोड ही त्याची उदाहरण म्हणता येतील. कोणी मदतीची याचना करताच हे लगेच धावून जात असल्याने त्या व्यक्तीला ते देवदूतच वाटतात. या आपत्तीच्या काळात संदीप रोडे यांच्या वयाचा विचार करून शासनाने त्यांना घरून काम करण्यास परवानगी दिली आहे. पण त्यांना फोन करताच ताबडतोब संबंधितांना कार्यक्षेत्राचा गोंधळ न करता मदत मिळणार याची खात्री बाळगता येते.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply