पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 28) कोरोनाच्या 56 रुग्णांची नोंद झाली, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महपालिका हद्दीत 29, पनवेल ग्रामीण 12, मुरूड पाच, रोहा तीन, पेण दोन, तर कर्जत, अलिबाग, माणगाव, तळा व म्हसळ्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. मृतांमध्ये पनवेल आणि कामोठे येथील रुग्णांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 956 आणि मृतांची संख्या 43 झाली आहे.
पनवेल तालुक्यात सर्वाधिक 41 रुग्ण आढळले व दोघांचा मृत्यू झाला. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथील 40 वर्षीय महिलेचा आणि पनवेल साईनगरमधील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. दोघांनाही मधुमेहाचा त्रास होता. कामोठ्यात 10 नवे रुग्ण आढळले. यात सहा वर्षीय मुलाचाही समावेश आहे. कळंबोलीत सात रुग्णांची भर पडली. खारघरमध्ये पाच पॉझिटिव्ह आढळले. पनवेल तक्का येथे दोन रुग्ण आहेत. घरातील पूर्वी पॉझिटिव्ह असलेल्यांपासून त्यांना संसर्ग झाला आहे. खांदा कॉलनी आणि नवीन पनवेलमध्येही दोन रुग्णांची नोंद झाली. पनवेल महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 2568 टेस्ट करण्यात आल्या. त्यातील 448 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, 86 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. 273 रुग्ण बारे झाले. 154 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये 12 नवीन रुग्ण आढळले. त्यात उसर्ली खुर्द येथील दोन महिला व एका रिक्षाचालकाचा समावेश आहे. करंजाडेत राहणार्या ठाणे महापालिकेतील नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. उलवे येथील महिला आणि अन्य व्यक्तीला संसर्ग झाला. विचुंबेत राहाणार्या व मुंबई महापालिकेत कामाला असणार्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. दापिवली येथील एका महिला व पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागात 449 टेस्ट घेण्यात आल्या असून, 32 टेस्टचे रिपोर्ट बाकी आहेत. आतापर्यंत 180 रुग्ण आढळले. त्यापैकी 114 रुग्णांनी कोरोनावर मात केली व सात जणांचा मृत्यू झाला. सध्या 53 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नवी मुंबईत 78 पॉझिटिव्ह; दोन रुग्णांचा मृत्यू
नवी मुंबई : येथे गुरुवारी (दि. 28) कोरोनाचे 78 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या एक हजार 931, तर बळींची संख्या 61 झाली आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी
पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …