Breaking News

नेरळमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

कर्जत ः बातमीदार

नेरळ गावामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शनिवारी (दि. 6) छत्रपती शिवाजी महाराज यांचा हिंदवी स्वराज्य राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ट पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. भल्या पहाटे शिवभक्त तरुण सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. सकाळी सहा वाजता नेरळ गावातील तरुणांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ट पुतळ्याला ब्राम्हणांच्या उपस्थितीत आणि मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक घालण्यात आला. या वेळी तरुण आणि शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply