Breaking News

चौक नागरिकांच्या गैरसोयी दुर न झाल्यास ठिय्या -विजय ठोसर

विद्युत महामंडळाला भाजपचे निवेदन

खालापूर : प्रतिनिधी – चौक विद्युत महामंडळाकडून नागरिकांना होणार्‍या गैरसोयीबद्दल तत्काळ उपायोजना करण्यात येईल, असे आश्वासन पनवेल येथील कार्यकारी अभियंता श्री जगताप यांनी दिले असल्याचे भाजप खालापूर तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विजय ठोसर यांनी सांगितले. परंतु या सर्व त्रुटी दूर करुन उपाययोजना झाल्या नाही तर श्री जगताप यांच्या दालनात ठिय्या आंदोलनाचा इशारा ठोसर यांनी दिला आहे.

तसेच महामंडळातील कर्मचारी वर्गाचे स्विच ऑफ होणारे फोन चालू करावे, त्रुटी व उणीवा लवकरच दूर करण्यात येईल यासाठी चौक विद्युत बोर्डाला व कर्मचारी, आधिकार्‍याना लेखी सूचना देण्यात येईल, कारभार सुधारणासाठी प्रयत्न करून मनुष्यबळाचा पुरवठा करणार असल्याचे श्री जगताप देणार यांनी ठोसर यांना सांगितले आहे. या वेळी मनोज गुरव, नागेश खरात आदी उपस्थित होते.

Check Also

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, …

Leave a Reply