Breaking News

छात्रभारतीकडून गरजूंना अन्नधान्याचे वाटप

मोहोपाडा ः प्रतिनिधी

कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात आलेल्या महामारीमुळे मजुरांचे व गरीब कुटुंबीयांचे हाल होत आहेत. लॉकडाऊन काळात आर्थिक आवकच बंद झाल्याने उदरनिर्वाह कसा करायचा याची चिंता त्यांना सतावत होती. या वेळी छात्रभारतीने पहिल्या टप्प्यापासून पाचव्या टप्प्यापर्यंत रसायनी, खालापूर, पनवेल तालुक्यातील गोरगरिबांना धान्यासह किराणा सामान वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.आतापर्यंत मोहोपाडा, नवीन पोसरी, रिस, शिवनगर, आली आंबिवली, पळस्पे, सुकापूर, विणेगाव, माजगाव, तुराडे, नढाळ वाडी, वावेघर येथे गरजू कुटुंबीयांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. छात्रभारतीचे अनेक कार्यकर्ते कोरोनाच्या संकटकाळात जीवनावश्यक  वस्तू वाटपाचे काम करीत आहेत.

Check Also

कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक

कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …

Leave a Reply