उरण : प्रतिनिधी
जागतिक दृष्टिदान दिनाचे औचित्य साधून उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण एकनाथ मढवी यांनी बुधवारी (दि. 10) लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे मरनोत्तर नेत्रदान संकल्प अर्ज भरुन नेत्रदान करण्याचे निर्धार केला आहे. या वेळी त्यांना प्रमाणपत्र डॉ. सचिन भुमकर, डॉ. भुपेश जैन आणि डॉ. रिटा धामणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागृती करण्यात येेेत आहे. मात्र आज असाच निर्णय किरण मढवी यांनी घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते. डोळा हा मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. आणि हेच जर आपल्या मरणानंतर दान केले तर एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यांनी हे जग पाहू शकते. त्यामुळे हा निर्णय त्यांनी घेतला आहे. नेत्रदान संकल्प अर्ज भरते वेळी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे समाजिक कार्यकर्ते विनोद पाचघरे, समाजसेवक प्रकाश पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते. या वेळी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांच्या या कार्याबद्दल कौतुक केले.