Breaking News

पनवेल तालुक्यात 51 जण पॉझिटिव्ह; 57 रुग्ण बरे

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 11) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण आढळले आहे. तर 57 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी कोरोनाच्या 44 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 55 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये सात नवीन कोरोनाबाधित आढळले असून दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 महापालिका हद्दीतील रुग्णांमध्ये कामोठे 13, खारघर आठ, पनवेल 15, कळंबोली तीन, नवीन पनवेल तीन, खांदा कॉलनी एक आणि तळोजामधील एका रुग्णाचा समावेश आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये कामोठ्यातील 20, खारघरमध्ये नऊ, कळंबोलीत आठ, न्यू पनवेल येथे 12, पनवेलचे सहा असा समावेश आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 861 रुग्ण झाले असून 596 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.22 टक्के आहे. 229 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये आकुर्ली व वावंजे येथे प्रत्येकी एक रुग्ण तर उलवे येथे दोन, विचुंबे येथे तीन नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. तसेच कोरोनावर मात केलेले दोन रुग्ण हे उसर्ली खुर्द व उलवे येथील आहेत. दरम्यान उरणमध्ये गरुवारी एक ही कोरोना रुग्ण आढळला नाही तर एका रुग्णांने कोरोनावर मात केली आहे.

नवी मुंबईत 195 नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत गुरुवारी (दि. 11) कोरोनाचे 195 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर तब्बल 83 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 107 झाली आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत एकूण तीन हजार 414 व्यक्ती पॉझिटिव्ह असून बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक हजार 998  झाली आहे. सद्या नवी मुंबईतील पालिका तसेच विविध खासगी रुग्णालयांत सद्यस्थितीत एक हजार 309 रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 12, नेरुळ 7, वाशी 22, तुर्भे 30, कोपरखैरणे 37, घणसोली 42, ऐरोली 35, दिघा 10 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply