Breaking News

झूम अॅपवर नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची सभा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची त्रैमासिक सभा आणि नवीन कार्यकारणी नियुक्ती सभा मंडळाचे अध्यक्ष धनराजजी विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पनवेल येथे डिजिटल झूम अ‍ॅप ऑनलाइन सभासद, पदाधिकार्‍यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून घरीच झाली.

शांताराम सोनार यांनी सभेचे प्रास्ताविक करत सभेचा हेतू स्पष्ट केला. तसेच मागील सभेचे इतिवृत वाचन केले. विजय भामरे यांनी मंडळाच्या मागील वार्षिक हिशोबाचे वाचन केले. अध्यक्ष धनराजजी विसपुते यांनी मंडळाच्या आतापर्यंतच्या वाटचाली संदर्भात आढावा घेऊन सर्वांना मार्गदर्शन केले व नूतन कार्यकारिणीची घोषणा केली.

नव्याने नियुक्त करण्यात आलेले महिला मंडळ अध्यक्ष संगिता विसपुते, नवनिर्वाचित युवा अध्यक्ष ऋषिकेश थोरात, नवनिर्वाचित अध्यक्ष संजय खरोटे (तुर्भे), सचिवपदी हेमकांत सोनार (अलिबाग), याचसोबत कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख सल्लागार, कोषाध्यक्ष, सहसचिव ,सहकोषाध्यक्ष यासारख्या महत्त्वाच्या पदांवर मान्यवरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सूत्रसंचालन डॉ. सीमा कांबळे यांनी केले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply