अलिबाग : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. या वादळग्रस्तांना सरकारी मदत अद्याप मिळालेली नाही. अलिबाग विभागातील गरजू वादळग्रस्तांना भारतीय जनता पक्षातर्फे सिमेंट पत्रे वाटप करण्यात आले.
3 जून रोजी कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने अक्षरश: होत्याचे नव्हते केले. रायगड जिल्ह्याला या नैसर्गिक आपत्तीचा फार मोठा फटका बसला. जिल्ह्यातील अनेक घरांचे पत्रे, कौले उडून छप्परच नाहीसे झाले आहे. पावसाळा सुरू असल्याने या वादळग्रस्तांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. हे लक्षात घेऊन कोकण दौर्यावर आलेल्या भाजप नेत्यांनी वादळग्रस्तांना पत्रे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अलिबाग तालुक्यात आश्वासनाची पूर्तता करण्यात आली आहे.
भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते सिमेंट पत्र्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, सरचिटणीस प्रदीप पुनकर, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अशोक वारगे, शहर अध्यक्ष अॅड. अंकित बंगेरा, तालुका युवा अध्यक्ष पुनितशेठ आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …
RamPrahar – The Panvel Daily Paper