पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 17) कोरोनाच्या तब्बल 87 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत 41, पनवेल ग्रामीणमध्ये 18, पेण तालुक्यात 12, महाड तालुक्यात पाच, कर्जत तालुक्यात चार, अलिबाग तालुक्यात तीन आणि उरण, खालापूर, रोहे व माणगाव तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे, तर मृतांमध्ये पनवेल मनपा हद्दीतील कामोठे येथील दोन, कळंबोली व तळोजा-पाचनंद येथील एक आणि अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर येथील एक अशा पाच रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे दिवसभरात 23 रुग्ण बरे झाले. दरम्यान, नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1983वर पोहचला असून, मृतांची संख्या 89 झाली आहे.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper