Breaking News

रायगड जिल्ह्याने पार केला दोन हजार रुग्णांचा टप्पा

पनवेल : रायगड जिल्ह्याने कोरोना रुग्णांचा दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यात गुरुवारी (दि. 18) कोरोनाच्या 84 रुग्णांची भर पडली असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 51, पनवेल ग्रामीणमधील 17, उरण तालुक्यातील सात, अलिबाग तालुक्यातील सहा आणि पेण तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे, तर मृत्युमुखी पडलेले दोन रुग्ण पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोली येथील आहेत. दुसरीकडे दिवसभरात 43 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2067वर जाऊन पोहचला असून, मृतांची संख्या 91 इतकी झाली आहे.  

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply