Breaking News

संजयआप्पा ढवळे ‘कोविड योद्धा’ने सन्मानित

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांना कोविड योद्धा पुरस्काराने नुकतेच तळाशेत येथे सोशल डिस्टन्सिंग ठेवून सन्मानित करण्यात आले. त्यांनी कोरोना काळात जनतेला मदतीचा हात दिला असून, ते अविरत

कार्यरत आहेत.

या कार्यक्रमास भाजपचे अ‍ॅड. परेश जाधव, बाबूराव चव्हाण, विशाल गलांडे, उमेश साटम, संजय जाधव, महिला मोर्चाच्या हेमा मानकर, शर्मिला सत्वे, दिपाली जाधव, यशोधरा गोडबोले, स्मिता भोईर, नीलम काळे, उषा महाडिक आदी उपस्थित होते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख व ज्येष्ठ पत्रकार डॉ. आरिफ पागारकर यांच्या हस्ते आणि कार्याध्यक्ष प्रभाकर मसुरे, सल्लागार मजिद हाजिते, निलेश म्हात्रे यांच्या साथीने ढवळे यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.

दिपाली जाधव यांनाही सन्मानपत्र

माणगाव : बेलदार क्रांती सेनेच्या वतीने कोरोना संकटात समाजासाठी कार्य करणार्‍या माणगाव येथील भाजप महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्त्या  दिपाली महेंद्र जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

करण्यात आला.

संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कर्णिक, अहमदनगर जिल्हाध्यक्ष अंकुश वाकचोरे, अकोले तालुकाध्यक्ष नारायण चव्हाण, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सरचिटणीस गोरख मोहिते यांनी जाधव यांना सन्मानपत्र प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply