पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 11) कोरोनाच्या 384 रुग्णांची भर पडली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 169, पनवेल ग्रामीण 54, पेण तालुक्यातील 38, उरण 30, खालापूर 28, अलिबाग 18, कर्जत 15, मुरूड 12, पोलादपूर 10, रोहा सहा, महाड दोन, तळा व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात दोन आणि कर्जत, अलिबाग व मुरूड तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा सात हजार पार करून 7282वर गेला असून, मृतांची संख्या 205 इतकी झाली आहे. दुसरीकडे दिवसभरात 214 रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या 4118 झाली आहे. जिल्ह्यात सध्या 3009 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper