Breaking News

रायगडात 352 नवे कोरोनाबाधित; सात रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या 352 कोरोना रुग्णांची नोंद शुक्रवारी (दि. 15) झाली असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 179 (महापालिका 145 व ग्रामीण 34), अलिबाग 57, पेण 39, उरण 31, खालापूर 23, मुरूड 14, कर्जत चार, रोहा दोन, श्रीवर्धन, महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण उरण व खालापूर प्रत्येकी दोन, पनवेल, अलिबाग, पोलादपूर तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 383 रुग्ण बरे झाले आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 9563वर पोहोचला असून, मृतांची संख्या 256 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5855 रुग्णांनी कोरानावर मात केल्याने सध्या 3501 रुग्ण सक्रिय आहेत.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply