Breaking News

खालापूरजवळ अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू

खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर तालुक्यातील कलोते गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीवरील पती-पत्नी जागीच मृत्युमुखी पडले.
 मूळचे गोवा येथील थॉमस अँथनी गोम्स व त्यांचे कुटुंब अनेक वर्षे खालापुरात वास्तव्यास आहेेत. थॉमस गोम्स (47) व त्यांची पत्नी ग्लोरी गोम्स (40) हे त्यांच्या दुचाकी (एमएच 46 एटी 2133)वरून दवाखान्यात जात होते. मुंबई-पुणे महामार्गावरील माधव बागसमोर पुण्याच्या दिशेने जाणार्‍या भरधाव मालवाहू ट्रकने गोम्स यांच्या दुचाकीला मागून ठोकर मारली. या अपघातात गोम्स दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून चौक येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्याने त्याच्याविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply