1 ऑगस्टपासून कार्यवाही; नियम मोडल्यास होणार दंड
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
संक्रमण कालावधीत देशातील पहिल्या एक्स्प्रेस वे म्हणजेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवासी नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. एक्सप्रेस वेवर आता गती मर्यादा लागू करण्यात आली आहे. जर कोणी नियम तोडला तर त्याला एक हजार रुपये दंड ठोठावला जाईल.
रायगड जिल्ह्यातील खालापूर आणि पुणे जिल्ह्यातील उर्स टोल प्लाझा दरम्यान जवळपास 50 कि.मी. अंतर आहे आणि कोणत्याही वाहनास निर्धारित गती मर्यादा पार करण्यासाठी 37 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागायला नको. या वेग मर्यादेचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांना दंड ठोठावला जाईल आणि ई-चालान पाठविला जाईल, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे
पहिला दंड एक हजार रुपये असेल
मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्टपासून या एक्सप्रेसवेवर गती मर्यादेचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास 1 हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. तसेच वारंवार अशी चूक केल्यावर दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे. 94 किलोमीटर लांब असलेल्या या मार्गावर गती मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास अशी ठेवण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper