नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉक-3 जाहीर केला आहे. 1 ऑगस्टपासून तो संपूर्ण देशात लागू होईल. यासाठी सरकारच्या वतीने नवीन नियमावलीही जारी करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने जारी केल्या या नियमावलीप्रमाणे 5 ऑगस्टपासून जिम खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर सरकारने नाईट कर्फ्यूदेखील हटवला आहे, मात्र या काळात मेट्रो, रेल्वे आणि चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत. याशिवाय सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी सविस्तर चर्चा करून शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस 31 ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …