Breaking News

कोरोना चाचणी प्रयोगशाळेची रायगडकरांना अद्यापही प्रतीक्षा

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात एप्रिल अखेरपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अलिबाग येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. स्वातंत्र्यदिनी ही प्रयोगशाळा सुरू होईल, असे सांगण्यात आले होते, मात्र ही प्रयोगशाळा अद्याप सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे रायगडकरांना कोरोना चाचणीसाठी मुंबई किंवा नवी मुंबईतील प्रयोगशाळांवरच अवलंबून राहावे लागत आहे.
रायगडातील संशयितांना कोरोना चाचणीसाठी नवी मुंबई किंवा मुंबई गाठावी लागत होती. ते खर्चिक तर होतेच, परंतु लॉकडाऊनच्या काळात ते अडचणीचेही ठरत होते. त्यामुळे अलिबाग येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याची घोषणा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मेच्या अखेरीस केली होती, परंतु अडीच महिने झाले तरी ही प्रयोगशाळा कार्यान्वित झाली नाही.
रायगडातील कोरोना रुग्णसंख्या 20,595 इतकी आहे. असे असतानाही येथे तातडीने कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू होऊ शकली नाही.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply