Breaking News

गणेशोत्सवात अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी

अलिबाग ः प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. 16 टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांसाठी ही बंदी असेल. 18 ऑगस्टला रात्री 12 वाजल्यापासून 22 ऑगस्टपर्यंत, तसेच 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 29 ऑगस्टपर्यंत ही बंदी लागू असेल.
या कालावधीत रेती, वाळू किंवा त्यासारख्या गौण खनिजांच्या वाहतुकीलाही पूर्णपणे बंदी असणार आहे.

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply