उरण ः प्रतिनिधीउरण येथील पूर्वीचे पँथरचे कार्यकर्ते संजय गायकवाड यांचे सामाजिक काम तसेच कामगार व सर्व थरातील श्रमिकवर्गात कामाचे संघटन कौशल्य पाहून केंद्रीय समाज कल्याण मंत्री, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा तथा कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या हस्ते संजय गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)च्या उरण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने उरण तालुक्यातीळ सर्व थरातील लोकांत उत्साहाचे वातावरण आहे. याबद्दल माजी आमदार सुमंतराव गायकवाड, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रीय सरचिटणीस दयानंद बहादुरे, नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओव्हाळ, मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper