पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 16) 15 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 329 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे 304 रुग्ण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये कर्जत तालुक्यातील चार, पनवेल तीन, रोहा व अलिबाग प्रत्येकी दोन आणि उरण, खालापूर, पेण व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल तालुक्यात 212, अलिबाग 24, खालापूर 23, पेण 20, रोहा 19, उरण 15, कर्जत सात, महाड पाच, श्रीवर्धन तीन, सुधागड एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 21,387 आणि मृतांची संख्या 620 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 17,194 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3573 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …
RamPrahar – The Panvel Daily Paper