नवी दिल्ली : सुरक्षा क्षेत्रात सुविधांची निर्मिती करण्यात आत्मनिर्भर होण्याची आमची कटिबद्धता फक्त चर्चा किंवा कागदपत्रांपुरती मर्यादित नाही, तर त्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते सुरक्षा परिषदेत बोलत होते. गेल्या कित्येक वर्षांपासून शस्त्रांच्या कारखान्यांना सरकारी विभागाप्रमाणे चालवले जात होते. एका मर्यादित दृष्टिकोनामुळे देशाचे नुकसान तर झाले आहेच, शिवाय तिथे काम करणार्या मेहनती, अनुभवी आणि कुशल कामगारांचेही मोठे नुकसान झालेे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी नाव न घेता आधीच्या सरकारवर केली. गेल्या बर्याच काळापासून देशाच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीवर निर्णय होत नव्हता. हा निर्णय भारताच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, असेही पंतप्रधान मोदींनी या वेळी सांगितले.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper