पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मार्गदर्शनपर प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा आरंभ संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरयांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) करण्यात आला. या तीन दिवसीय उपक्रमात संस्थेच्या महाविद्यालय-विद्यालयांचे प्राचार्य आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेत कार्यरत असलेल्या प्राचार्य आणि प्रशासकीय स्टाफला विद्यालय-महाविद्यालयीन कामकाज योग्य पद्धतीने आणि सहजनेते कशा प्रकारे चालवावे याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रशिक्षणाच्या उद्घाटनास संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य राज अलोनी यांच्यासह संस्थेच्या महाविद्यालय-विद्यालयांचे प्राचार्य आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.
Check Also
देशाचे प्रधानसेवक म्हणून नरेंद्र मोदी कार्यरत -मंत्री ॲड. आशिष शेलार
पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे प्रधानसेवक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. म्हणूनच जनतेचा त्यांच्यावर …
RamPrahar – The Panvel Daily Paper