Breaking News

विद्यार्थी मारहाणीचा पनवेलमध्ये निषेध

उत्तर रायगड भाजयुमो राज्य सरकारविरोधात आक्रमक

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना काळात शैक्षणिक शुल्कात 30 टक्के कपात करा, ज्या परीक्षा झाल्याच नाहीत त्यांचे शुल्क परत करून विद्यार्थ्यांना दिलासा द्या, या मागण्यांचे पत्र द्यायला गेलेल्या धुळे शहरातील विद्यार्थ्यांना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री सत्तार अब्दुल यांच्यासमोर अमानूष मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व विद्यार्थीविरोधी राज्य सरकारचा भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगडच्या वतीने शुक्रवारी (दि. 28) पनवेलमध्ये तीव्र निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार व शिक्षणमंत्री उदय सामंत हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्री उदय सामंत व धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या संदर्भात तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विवेक होन, सदस्य परेश बोरसे, पनवेल तालुका (ग्रामीण) अध्यक्ष आनंद ढवळे, पनवेल शहर मंडल अध्यक्ष रोहित जगताप, खारघर मंडल अध्यक्ष विनोद घरत, कामोठे मंडल अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, रोहित घरत, चिटणीस रोशन पाटील, ओमकार पाटील, खारघर मंडलचे उपाध्यक्ष शुभ पाटील, अक्षय पाटील, सदस्य रितेश रघुराज, करीम पटेल, पनवेल शहर मंडल उपाध्यक्ष अभिषेक भोपी, चिटणीस अयुफ अकुला, सदस्य संकेत डोके, अजिंक्य भिडे, अथर्व गुजरे, अनिकेत भोईर, आकाश बैद, नितेश घुगे, कामोठे मंडल उपाध्यक्ष उपाध्यक्ष तेजस जाधव, सरचिटणीस नवनाथ भोसले, चिटणीस मयंक कुमार, सदस्य आदित्य भगत, कळंबोली मंडल सरचिटणीस सिद्धेश राजेंद्र बनकर, उपाध्यक्ष गौरव नाईक, चिटणीस निशांत गिल, सदस्य मनीष अग्रहरी, शरथ दासराजू, सुजित कुमार आदी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रभरातील विद्यार्थी हे परीक्षा न घेता जमा करण्यासीत आलेले परीक्षा शुल्क परत करावे व कोरोनामुळे नागरिकांची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता येत्या 2020-21 या शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे अशा रास्त मागण्या करीत आहेत. धुळे येथे याच मागण्या पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अमानूष पद्धतीने मारहाण करण्यात आली. गोरगरीब विद्यार्थ्यांवरील या मारहाणीचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी पनवेलमध्ये जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कोरोना वैश्विक महामारीमुळे महाराष्ट्रातील अनेकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. याचा विचार करता विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष 2020-21चे 30% शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे तसेच उर्वरित आकारण्यात येणारे शुल्क हफ्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना त्वरित परत करावे, अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत त्यामध्ये सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले, परंतु जे विद्यार्थी प्रथम सत्रात सर्व विषयांत उत्तीर्ण झाले होते अशा विद्यार्थ्यांनादेखील काही विषयांत अनुत्तीर्ण केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन करून निकाल घोषित करण्यात यावेत तसेच परीक्षेबाबाबत या धोरणाच्या पातळीवरील घोळामुळे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्या सर्व विद्यार्थांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे या मागण्यांसाठी 26 ऑगस्ट रोजी धुळे येथील विद्यार्थ्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची वेळ मागितली होती, पण असंवेदनशील पालकमंत्र्यांनी भेट नाकारली. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांसमोर स्वतःच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. या वेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत व आदेशानुसार गोरगरीब विद्यार्थ्यांना अमानूष मारहाण करण्यात आली. हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे व अशा मंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही. म्हणून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. त्याचप्रमाणे एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्रात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे. कोरोनाच्या काळातही विद्यापीठ व राज्य शासन विद्यार्थ्यांसह पालकांची लूट करीत आहे. चुकीच्या निकालांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे पाप उच्च शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. याची जबाबदारी स्वीकारत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा राजीनामा घेण्यात यावा अशा मागण्या नमूद करून त्यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा येत्या काळात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलने करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply