Breaking News

रायगडात 549 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 13 रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 549 नव्या कोरोना रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी (दि. 29) झाली. दुसरीकडे 386 जण दिवसभरात बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 225, ग्रामीण 58) तालुक्यातील 283, अलिबाग 71, माणगाव 48, रोहा 40, खालापूर 35, कर्जत 17, पेण 15, उरण 12, महाड व पोलादपूर प्रत्येकी 10, सुधागड चार, तळा तीन आणि श्रीवर्धन तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल (मनपा पाच, ग्रामीण तीन) तालुक्यात आठ, खालापूर दोन आणि कर्जत, अलिबाग व माणगावमधील प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 26,560 व मृतांची संख्या 792 झाली आहे. जिल्ह्यात 22,523 जण कोरोनामुक्त झाल्याने 3,308 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …

Leave a Reply