तिघांचा मृत्यू; 188 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात रविवारी (दि.30) कोरोनाचे 278 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 188 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 218 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 126 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 60 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 62 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात 218 नवीन रुग्ण आढळले. पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर 36 स्वप्नपूर्ती सोसायटीतील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवार आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2019 झाली आहे. कामोठेमध्ये 23 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2467 झाली आहे. खारघरमध्ये 39 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 2339 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 54 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2156 झाली आहे. पनवेलमध्ये 72 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2062 झाली आहे. तळोजामध्ये एक नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 609 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 11652 रुग्ण झाले असून 10083 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.53 टक्के आहे. 1287 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 282 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे 19, करंजाडे आठ, सुकापूर सात, विचुंबे तीन, आदई तीन, पळस्पे दोन, साई दोन, भाताण दोन, नारपोली, उसर्ली, न्हावा, कोपर-गव्हाण, हरिग्राम, डेरवली, भोकरपाडा, वावेघर, वलप, शेडुंग, सावळे, सांगुर्ली आणि आकुर्ली येथे प्रत्येकी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. तर विचुंबे आणि गिरवले येथील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्हची संख्या 3483 झाली असून 2949 जणांनी कोरोनावर मात केली असून 69 जणांचा मृत्यू झाला आहे.
रोहा तालुक्यात 20 जणांना संसर्ग
रोहे : प्रतिनिधी
रोहा तालुक्यात रविवारी 20 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक रोहा शहरात 17 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ग्रामीण भागात तीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे रोहा तालुक्याची कोरोना रुग्णांची संख्या 1234 वर पोहोचली आहे. रोहा तालुक्यात आतापर्यंत 947 व्यक्तीने कोरोनावर मात करीत बरे होत आपल्या घरी गेले आहेत. 256 रुग्णांवर उपचार चालू आहेत. रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये 13 पुरुष व सात महिलांचा समावेश आहे. यामध्ये 60 वर्षावरील पाच व्यक्ती बाधित आहेत.
उरण तालुक्यात 20 जण बाधित
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यात रविवारी कोरोना पॉझिटिव्ह 20 रुग्ण आढळले व एक रुग्ण बरा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये चाणजे तीन, स्टार कॉम्प्लेक्स म्हातवली दोन, जेएनपीटी दोन, भानुशालीवाडी करंजा, देऊळवाडी शंकर मंदिरजवळ, पागोटे, कुंभारवाडा ओमकार कॉलनी, मोठी जुई, सावरखार, नवे नगर करंजा, गौरीनंदन अपार्टमेंट चारफाटा, उरण पोलीस स्टेशन, नयन अपार्टमेंट बाजारपेठ, सोनारी, सीआयएसएफ, द्रोणागिरी बोकडवीरा उरण येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिघोडे येथे एक रुग्णाचा समावेश आहे.उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1354 झाली आहे. त्यातील 1107 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 182 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आज पर्यंत 65 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
कर्जतमध्ये आढळले 19 पॉझिटिव्ह
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
कर्जत तालुक्यात रविवारी नवीन 19 कोरोना बाधित आढळले आहेत त्यातच एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 41 झाली आहे. आजपर्यंत तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 844 वर पोहोचली असून 695 रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये नेरळ आठ, कर्जत शहरातील आमराई विभाग, नानामास्तर नगर, कचेरी रोडवरील एक इमारत, पाटील आळी, भिसेगाव, एकसळ, गौळवाडी, कर्जत, नेरळ माथेरान रोडवरील इमारत, उकरूळ, हलीवली येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper