Breaking News

बेलपाड्यात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील बेलपाडा येथे गव्हाण ग्रामपंचायत फंडाच्या माध्यमातून पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत.

बेलपाडा येथील हनुमान मंदिराच्या परिसरात होत असलेल्या या विकासकामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि पंचायत समिती सदस्य व भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 15) करण्यात आले.या कार्यक्रमास गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, अरुण घरत, अशोक घरत, दीपक पाटील, प्रसाद म्हात्रे, सुनील पाटील, कमलाकर म्हात्रे, गणेश पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, जयश्री कोळी, हेमलता ठाकूर, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक

विविध विषयांवर विचारविनिमय पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक …

Leave a Reply