पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 2) कोरोनाचे 307 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 245 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 226 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 191 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 81 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 54 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर सेक्टर 12 विक्रमशीला रो हाऊस, प्रीती संगम सोसायटी, सेक्टर 32 ओवे पेठ गाव, कळंबोली नावाडे फेज -2 निलकमल आराधना सोसायटी, नावाडे राम मंदीरा जवळ, खांदा कॉलनी उत्कर्षा सोसायटी आणि पनवेल रजनीगंधा अपार्टमेंट येथी व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 36 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2109 झाली आहे. कामोठेमध्ये 49 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2595 झाली आहे. खारघरमध्ये 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 2465 झाली आहे.
नवीन पनवेलमध्ये 48 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2271 झाली आहे. पनवेलमध्ये 52 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2174 झाली आहे. तळोजामध्ये एक नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 613 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 12227 रुग्ण झाले असून 10521 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.05 टक्के आहे. 1411 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 295 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये आढळले 31 पॉझिटिव्ह
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यात बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह 31 रुग्ण आढळले व 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी टाऊनशीप पाच, नागाव द्वारकानगर दोन, जासई, नागाव, करंजा, नेव्हल स्टेशन करंजा, बोरी, करंजा रोड करंजा, कोप्रोली, सोनारी, कोंढरी पाडा, द्रोणागिरी नोड तुळशीवंदन, जसखार, शिवसेना ऑफीसजवळ नवीन शेवा, केगाव विनायक लक्ष्मी निवास, रिशी अपार्टमेंट केगाव, चीर्ले, भेंडखळ, हनुमान मंदिरजवळ विंधणे, बोरीनाका उरण, कातकरवाडी विंधणे, जसखार, धुतुम, विंधणे, मधीलपाडा चिरनेर, वेश्वी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1401 झाली आहे. त्यातील 1138 बरे झाले आहे. फक्त 198 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper