Breaking News

भाजपतर्फे ऑनलाइन शिक्षक कृतज्ञता सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्त

दरवर्षी शिक्षक दिन शाळेत साजरा करण्यात येतो परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पध्दतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरूच आहे. कोरोना काळातदेखील शिक्षक कोविड योद्धा म्हणून कोविड सेंटर क्षेत्रीय अधिकारी,

सर्वेक्षण, जनजागृती करीत आहेत. शिक्षकांच्या या कार्याचा सन्मान व्हावा या हेतूने कामोठे भाजप मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या सहकार्याने कामोठे भाजप मंडल शिक्षक सेल यांनी शिक्षकांचा ऑनलाइन कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता.

या कार्यक्रमात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी शिक्षकांना शुभेच्छा देत असताना कोरोना काळातील शिक्षकांच्या या कार्याचा गौरवदेखील केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात शिक्षकी पेशाने केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच स्वतःच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचेदेखील नमूद केले.

सेवा सहयोग ट्रस्टचे अभिनंदन शहा यांनी त्यांच्या संस्थेमार्फत शैक्षणिक क्षेत्रासाठी आयोजित केल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. या वेळी नोंदणी केलेल्या 58 शिक्षकांचे सन्मानपत्र ऑनलाइन प्रदर्शित करून या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कामोठे मंडल भाजप अध्यक्ष रवींद्र जोशी यांनी भविष्यातदेखील शिक्षकांच्या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या ऑनलाइन शिक्षक कृतज्ञता सोहळ्याचे प्रास्ताविक शेखर जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन भूषण जोशी यांनी केले. तांत्रिक सहकार्य दिनकर खुरपूडे यांनी केले. या वेळी कामोठे भाजप मंडल सरचिटणीस भास्कर दांडेकर, प्रज्ञा सेल संयोजक सुशील धुलंधर, शिक्षक सेल सदस्य पांडुरंग करे, प्रदीप खी, रोहन दहिवले, साईनाथ दहिफळे, प्रतिभा ढोले, राजेंद्र पिंगळे, संजय धोंडगे, बाळासाहेब नाईकनवरे, जहिदा मकानदार, वैशाली जगदाळे आदी उपस्थित होते. 58 शिक्षकांनी ऑनलाइन तर तीन शिक्षकांनी ऑफलाइन नोंदणी केलेल्या या सोहळ्यास प्रत्यक्ष 39 शिक्षक सहभागी झाले होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply