पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 426 नव्या कोरोना रुग्णांची आणि 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 21) झाली, तर दिवसभरात 651 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 292, अलिबाग 34, पेण 19, रोहा 16, महाड 14 खालापूर व कर्जत प्रत्येकी 12, उरण नऊ, माणगाव सहा, मुरूड व सुधागड प्रत्येकी पाच आणि श्रीवर्धन तालुक्यातील दोघांचा समावेश आहे; तर मयत रुग्ण अलिबाग तालुक्यात तीन, पनवेल, खालापूर, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन आणि महाड तालुक्यात एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 41 हजार 958 आणि मृतांची संख्या 1116 झाली आहे. जिल्ह्यात 35 हजार 267 जण कोरोनामुक्त झाल्याने 5575 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
Check Also
युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्मेट वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश …
RamPrahar – The Panvel Daily Paper