Breaking News

‘सेवापुस्तक आपल्या दारी’; कर्जत शिक्षण विभागाचा उपक्रम

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील शिक्षण विभागाने सेवापुस्तक आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ कर्जतचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सेवापुस्तक हा सरकारी कर्मचार्‍याचा आत्मा असतो.  सेवाकाळात व निवृत्त होताना या सेवापुस्तकास अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेवापुस्तकातील नोंदीवरूनच कर्मचार्‍याचे निवृत्तीवेतन व इतर भत्ते ठरत असतात. सेवापुस्तक अद्ययावत असणे गरजेचे व आवश्यक बाब आहे तसेच त्याची दुय्यम प्रत बनवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. ही गरज ओळखून कर्जत पंचायत समिती शिक्षण विभागाने सेवापुस्तक आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्या दिवशी ज्या केंद्राचा नंबर असेल त्या दिवशी शिक्षकांनी दुय्यम सेवापुस्तकात मूळ सेवापुस्तकानुसार नोंदी करून लगेच गटशिक्षणाधिकार्‍यांच्या सह्या घ्यायच्या आहेत. त्यामुळे भविष्यात शिक्षकांना होणारा त्रास व कार्यालयात वारंवार मारावे लागणारे हेलपाटे यातून सुटका होणार आहे. सर्व शिक्षकांनी विशेषतः निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणार्‍या शिक्षकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

Check Also

खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …

Leave a Reply