Breaking News

‘कलादर्पण’च्या ऑनलाइन कार्यक्रमाला प्रतिसाद

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

कलादर्पण या कलाप्रेमी संस्थेच्या वतीने एका शास्त्रीय संगीतावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. मिलिंद गोखले यांच्या संकल्पनेतून स्वराधना या संगीतप्रेमी संस्थेने हा कार्यक्रम केला. कल्याण छाया या नावाने झालेल्या कार्यक्रमात पनवेल परिसरातील कलाकारांनी सहभाग घेतला. या गायकांनी कल्याण थाटातील यमन, कल्याण, भूप, केदार, मारुबिहाग अशा विविध रागातील बंदिशी तसेच नाट्यगीत, भावगीत, गजल आदी गीतप्रकारांचे सादरीकरण केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम ऑनलाइन झाला. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. मिलिंद गोखले, रेणुका दलाल, वंदना सहस्रबुद्धे, चैत्राली देसाई, वर्षा जोशी, गिरीश समुद्र, पल्लवी देशपांडे, डॉ. निहारिका व अनुष्का भिडे, भारती देशपांडे आदी कलाकारांनी या कार्यक्रमात सादरीकरण केले. पद्मनाभ भागवत यांनी उत्कृष्ठ तंत्रसहाय्य करून या कार्यक्रमाची रंगत वाढवली. ‘कलादर्पण’चे निर्माते व साहित्यिक शंकर आपटे, अध्यक्ष डॉ.  अरविंद बेलापूरकर, सचीव नृपाली जोशी, खजिनदार दिपाली जोशी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वराधना समूहाची प्रशंसा केली.

कोणत्याही प्रकारचे गायन शिकायचे असेल तरी स्वर, ताल आणि लयीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. यासाठी शास्त्रीय संगीत हा सर्वांचा आधार आहे. समाजात शास्त्रीय संगीताबद्दल अभिरुची वाढण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे आवश्यक आहे.

-पं. मिलिंद गोखले, ज्येष्ठ शास्त्रीय गायक

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply