Breaking News

नागोठणे पोलिसांच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा

नागोठणे ः प्रतिनिधी : रमजान ईदनिमित्त येथील पोलीस ठाण्याच्या वतीने आज सकाळी नऊ वाजता प्रार्थनास्थळासमोर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे तसेच पोलीस कर्मचारी वर्गाकडून मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

या वेळी माजी सरपंच फरमानशेठ दफेदार, अशफाक पानसरे, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, सिराज पानसरे, वसीम बोडेरे आदी मान्यवरांसह  शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply