पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 10 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 207 नव्या रुग्णांची नोंद सोमवारी (दि. 12) झाली, तर दिवसभरात 308 रुग्ण बरे झाले आहेत.
मयत झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा सात व ग्रामीण 1) तालुक्यातील आठ आणि उरण व कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल (मनपा 114, ग्रामीण 51) तालुक्यात 165, पेण 13, माणगाव 11, अलिबाग सहा, खालापूर चार, तळा तीन, उरण व रोहा प्रत्येकी दोन आणि महाड तालुक्यातील एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 50 हजार 740 आणि मृतांची संख्या 1437 झाली आहे. जिल्ह्यात 46 हजार 287 जण कोरोनामुक्त झाल्याने 3016 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper