Breaking News

नवी मुंबईत आयसीयू बेडची संख्या वाढणार

आमदार गणेश नाईक यांच्या मागण्या मान्य

नवी मुंबई : बातमीदार

इमारत सुरक्षित रहावी यासाठी त्यावर बांधण्यात आलेल्या वेदरशेड आता नियमित होणार आहेत. त्याच बरोबर हिवाळ्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता आयसीसीयु बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे. आमदार गणेश नाईक यांनी सोमवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा आढावा घेण्यात आला या बैठकीत आमदार नाईक यांनी सुचविलेल्या महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.

कोकणातील पावसाळा पाहता पंचवीस ते तीस वर्षे जुन्या इमारतींमध्ये गळती होते इमारतीच्या संरक्षणासाठी सोसायट्या टेरेस वर वेदर शेड बांधतात मात्र या शेड नगर विकास विभागाच्या नियमांमध्ये बेकायदा असल्याने त्यांना महापालिकेच्या वतीने नोटिसा देण्यात येतात इमारती संरक्षण करण्याच्या हेतूने बांधण्यात आलेल्या या वेदर शेड नियमित करण्यासाठी आमदार नाईक यांच्या सूचनेनुसार नव्याने तयार झालेल्या महापालिकेच्या विकास आराखड्यात वेदर शेड नियमित करण्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या वेदर शेड नियमित करण्याच्या सूचने सह हा विकास आराखडा महापालिकेने शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेला आहे तो लवकरच मंजूर होऊन आल्यावर इमारतींवरील वेदर शेड कायम होणार आहेत. माजी नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी नेरूळमधील आर्मी सोसायटीला वेदर शेड विषयी पालिकेने दिलेल्या नोटीस बाबत लोकनेते नाईक यांच्याकडे विषय उपस्थित केला असता आ. नाईक यांनी याबाबत आयुक्त बांगर यांच्याशी चर्चा केली आणि या वेदर शेड लवकरात लवकर नियमाकुल करण्याची मागणी केली. त्याला आयुक्त बांगर यांनी होकार दर्शवला.

नवी मुंबईत वाढणार्‍या प्रदूषणाविरोधात आमदार नाईक यांनी या बैठकीमध्ये आक्रमक भूमिका मांडली. मागील साप्ताहिक आढावा बैठकीत देखील त्यांनी वाढते प्रदूषण रोखण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. आज पुन्हा या गंभीर विषयाकडे त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधून जर प्रदूषण नियंत्रणात आले नाही तर जनतेला होणारा त्रास पाहता प्रदूषण नियंत्रण मंडळावर मोर्चा नेण्यात मागेपुढे पाहणार नाही असा इशारा दिला. माजी नगरसेविका वैशाली नाईक यांनी आणि इतर माजी नगरसेवकांनी हा विषय आ. नाईक यांच्याकडे मांडला होता.

या बैठकीला माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक रामचंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

हिवाळा ऋतूमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका

हिवाळा ऋतूमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आरोग्य यंत्रणांकडून व्यक्त होतो आहे. भविष्यात जर कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड सह आवश्यक सर्व उपाययोजना आताच करण्याची सूचना लोकनेते नाईक यांनी आयुक्तांना या वेळी केली. ही सूचना मान्य करत महापालिकेकडे सद्यस्थितीत 443 आयसी यू बेड असून त्यामध्ये आणखी 200 बेडची भर घालणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply